मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अनेक दिग्ग्जांच्या उपस्थितीत अमित त्याची मैत्रिण मिताली बोरुडेसोबत विवाहबद्ध झाला. या विवाहसोहळ्याला उद्योग,राजकीय, चित्रपट आणि क्रीडा जगतातील मान्यवर उपस्थित होते.